#VidarbhaDarshan - पैनगंगा अभयारण्य पैनगंगा अभयारण्य यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा यांना विभागणाऱ्या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूंस असलेल्या संरक्षित वनास दिलेले नाव आहे. तीन बाजूंनी पाण्यानं वेढलेले एकमेव अभयारण्य असावे. पैनगंगा अभयारण्याची स्थापना १ जानेवारी १९९६ रोजी झाली. याचे क्षेत्रफळ सुमारे ३२५ चौ.कि.मी. इतके आहे. अभयारण्यात साग हा प्रमुख वृक्ष आहे. या अभयारण्यावर उपवनसंरक्षक (वन्यजीव) अकोला यांची देखरेख व थेट नियंत्रण आहे. पैनगंगा अभयारण्य हे यवतमाळहून सुमारे १५० किलोमीटरवर आहे. यवतमाळ-उमरखेडमार्गे किंवा यवतमाळ-महागाव-ढाणकी-बिटरगावमार्गे पैनगंगा अभयारण्यास पोहोचता येते. या दोन्ही मार्गांवर एस.टी. बसेस मिळतात. उमरखेड किंवा ढाणकी बिटरगावहून खाजगी वाहने आणि ऑटोरिक्षाही उपलब्ध असतात. श्यामा कोलामचीची टेकडी, मसलगा, दोधारी धबधबा, राजोबा देवस्थान, वाघ भुयार, एक शिवालय आणि सोनधाबी आणि सहस्रकुंड नावाचे धबधबे अशी येथील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. मात्र, रस्ते, वाहने, वाटाडे वगैरे सोयी नसल्याने पर्यटकांना सर्व ठिकाणी पोहोचणे शक्य होत नाही. १००० ते १५०० मिलिमीटर पर्जन्यमान आण...