विदर्भाचा प्राचीन इतिहास :- विदर्भ हे नाव 'विदर्भ' ह्या महाभारतकालीन राजाच्या नावापासून रूढ झाले. विदर्भातील कौदिन्यपुर ह्या रुख्मिनिच्या नगरीने त्या काळी कलेचे शिखर गाठल्याचे उल्लेख सापडतात. प्राचीन भारतातील काही स्त्रिया ह्या विदर्भाच्या आहेत. 'लोपामुद्रा ' हि विदर्भ राज्याची मुलगी, ' दयमन्ति ' हि विदर्भकन्या तर सर्वपरिचित आहे. 'इंदुमती' हि देखील कुंडी नापुराच्या भोजराजाची बहिण. विदर्भाचे ' भोज कट ' हे देखील एक नाव आहे. रुख्मिणीने ' भोज कट ' हि विदर्भाची राजधानी वसवली होती. गुत्समद ऋषींनी विदर्भात कापसाची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग प्रथम केला.त्यांनी कापसाचे सुत काढून त्याचे कापड विणण्याचा शोध लावला. त्यांची ख्याती गणिती, तत्ववेता , विणकर व कृषी संशोधक अशी होती. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसारही विदर्भात खोरवर झिरपला होता. याच्या खुणा उत्खनना वेळी सापडतात. सातवाहनांचे राज्य विदर्भावर दीर्घकालीन इसवी सनपूर्व २०० पासून सन २५० पर्यंत म्हणजे साडेचारशे वर्ष चालले.सातवाहन वंशातील सातकर्णी राजाच्या ताब्यात वैनगंगे पर्यंतचा प्रदेश हो...
आपला विदर्भ आपला अभिमान !!
आनंदेश्वर मंदीर लासूर दर्यापूर पासून १० कि..मी.अकोला मार्गावर
उत्तर द्याहटवा