#VidarbhaDarshan - नरनाळा वन्यजीव अभयारण्य
२ मे, १९९७ रोजी नरनाळा किल्ला व त्याच्या आजूबाजूचे घनदाट जंगल ‘नरनाळा वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. अकोल्यापासून ६० कि.मी. अंतरावर, सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये नरनाळा अभयारण्य वसले आहे. हे अभयारण्य अकोट तालुक्यात असून, १२.३५ चौ.कि.मी. क्षेत्रावर पसरले आहे. येथील तापमान ३५ ते ४३ अंश सेल्सिअस असते. वर्षभरात येथे ५०० ते ९०० मि.मी. पाऊस पडतो. या अभयारण्यात सांबर, बिबट्या, तसेच बार्किंग डिअर (विशिष्ट जातीचे हरीण) हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. ह्या अभयारण्यस ऐतिहासिक, जैविक, पौराणिक व पुरातत्त्वशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थान असून हे पर्यटकांसाठी एक आकर्षणकेंद्र बनले आहे.
अभयारण्यास जाण्याचा मार्ग -
अकोटपासून नागपूर विमानतळ २७० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यापासून अकोला रेल्वे स्टेशन ६५ कि.मी. अंतरावर आहे, तर अकोट मीटर गेज रेल्वे स्टेशन २० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यास जायला अकोट व अकोल्यापासून बस व टॅक्सीदेखील उपलब्ध आहेत. ऑक्टोबर ते मे हे दिवस अभयारण्यास भेट दे़ण्यास उत्तम आहेत. शहानूर गाव हे या अभयारण्यासाठीचा राजमार्ग ठरतो, तर नरनाळा अभयारण्य हे मेळघाट व्याघ‘ प्रकल्पाचा दक्षिणेकडील राजमार्ग ठरतो. नरनाळा अभयारण्य ‘इको-टुरिझम’ साठी प्रसिद्ध आहे.
एकदा जावेच लागेल
उत्तर द्याहटवा