विदर्भाचा प्राचीन इतिहास :-
विदर्भ हे नाव 'विदर्भ' ह्या महाभारतकालीन राजाच्या नावापासून रूढ झाले. विदर्भातील कौदिन्यपुर ह्या रुख्मिनिच्या नगरीने त्या काळी कलेचे शिखर गाठल्याचे उल्लेख सापडतात. प्राचीन भारतातील काही स्त्रिया ह्या विदर्भाच्या आहेत. 'लोपामुद्रा ' हि विदर्भ राज्याची मुलगी, ' दयमन्ति ' हि विदर्भकन्या तर सर्वपरिचित आहे. 'इंदुमती' हि देखील कुंडी नापुराच्या भोजराजाची बहिण. विदर्भाचे ' भोज कट ' हे देखील एक नाव आहे. रुख्मिणीने ' भोज कट ' हि विदर्भाची राजधानी वसवली होती.
गुत्समद ऋषींनी विदर्भात कापसाची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग प्रथम केला.त्यांनी कापसाचे सुत काढून त्याचे कापड विणण्याचा शोध लावला. त्यांची ख्याती गणिती, तत्ववेता , विणकर व कृषी संशोधक अशी होती. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसारही विदर्भात खोरवर झिरपला होता. याच्या खुणा उत्खनना वेळी सापडतात.
सातवाहनांचे राज्य विदर्भावर दीर्घकालीन इसवी सनपूर्व २०० पासून सन २५० पर्यंत म्हणजे साडेचारशे वर्ष चालले.सातवाहन वंशातील सातकर्णी राजाच्या ताब्यात वैनगंगे पर्यंतचा प्रदेश होता. सातवाहन राज्यात व्यापार होता. 'गाथा सप्तशती'हा ग्रंथ त्याच काळातला. गुणाढ्या ची 'बृहत्कथा' हि देखील त्या काळातली.
वाकाटक वंशाने प्रदीर्घ काळ म्हणजे सुमारे तीनशे वर्ष विदर्भावर राज्य केले.ते गुप्तांचे समकालीन समजले जातात. वत्सगुल्म ( वाशीम) हि वाकाटकांची राजधानी.
त्या काळातील विदर्भाच्या भौगोलिक सीमा ह्या उत्तरेस माळवा , पूर्वेला छत्तीसगड, ओरिसाचा काही भाग व आंध्र, पश्चिमेस मध्य व दक्षिण गुजरात राज्य व महाराष्ट्रात नाशिक पर्यंत आणि दक्षिणेस कुंतल म्हणजे दक्षिण महाराष्ट्रापर्यंत विस्तारलेल्या होत्या. हेरेशनाची सत्ता तर अरबी समुद्रापर्यंत पसरली होती.
विदर्भाने सहिष्णुतेचा संस्कार जपलेला आहे. कालिदासाचे 'मेघदूत' सर्वसेनाचा 'हरिविजय' हे ग्रंथ विदर्भातच निर्मिले गेले.
मराठी भाषेला भूषणा वह ठरलेल्या महानुभावांच्या परंपरेतील गोविन्द्प्रभू हे विदर्भाचे. त्यांची अमरावती जिल्ह्यातील रुद्धीपूर, रिद्धपूर हि कर्मभूमी. ती महानुभावांची काशी समजली जाते. ते महानुभाव पंथाचे उगमस्थान. खुद्द चक्रधर स्वामींचे वास्तव्य विदर्भात रामटेक, मेहकर,लोणार, रुद्धीपूर, सालबर्डी व अमरावती सारख्या यासारख्या ठिकाणी राहिले आहे.
शुक्राचार्य,दमन, मृदगल , जमदग्नी, मार्कांद्देय या ऋषींची स्थळे विदर्भात पयोष्णी म्हणजेच पूर्णा नदी काठची. वरदा, वसिष्ठा, विदर्भ म्हणजे वर्धा, वेणा अर्थात वैनगंगा आणि प्रणिता अर्थात पेनगंगा ह्या विदर्भातील नद्यांचे उल्लेख महाभारतापासून सापडतात.
उल्कापातामुळे तयार झालेले जागतिक ख्यातीचे लोणार सरोवर विदर्भातले. अमरावती हे मुळातले ' उमरावती' . यादवच्या पैठण आणि उमरावती या दोन राजधाण्यापैकी एक. गणेशपुराणात वर्णन असलेले कळंब हे यवतमाळ जिल्ह्यातले.
जैनांचे पवित्र स्थान 'मुक्तागीरी' हे एलीचपूर च्या जवळ आहे. एलीचपूर हे तर 'ईल ' या जैन राजाने वसवल्याची कथा प्रचलित आहे. 'शिरपूर' हे जैनांचे पवित्र स्थानही विदर्भात आहे.
शिवाजीराजांचा तीन दिवस मुक्काम लाभलेले व त्यावेळी त्यांनी कस्तुरींचे उंट विकत घेऊन ती कस्तुरी ज्या मातीत टाकण्याची कथा
सांगितली जाते, ती माती विदर्भाच्या कारंजाची. मुळात ते दत्ताचे ठाणे. सिंदखेडराजा हे तर जीजामातेचे माहेरघर!
अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीच्या स्वारीहून परततांना एलीचपूर चा ताबा घेऊन आपला अधिकारी तेथे नेमला होता. पुढे, तो रामचंद्र देवाकडे गेला. त्याला खंडणी मात्र खिलजीकडे पाठवावी लागत होती. खिलजीचा विदर्भावर अंमल १३१८ पासून सुरु झाला.एलीचपूर हे मुसलमान शासनाचे महत्वाचे केंद्र बनले ते इंग्रजी राजवटी पर्यंत. पुढे, तुघलक घराण्याचा प्रतिनिधी उमाद उल-मुल्क हा वर्हाडात नेमला होता. ( क्रमशः )
Source - प्रदीप धामणकर, पांढरकवड़ा जि. यवतमाळ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा