मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

अमरावती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आनंदेश्वर मंदिर, लासूर

आंनदेश्वर, लासुर, अमरावती     सध्या माझा मुक्काम माहेरी दर्यापूरला आहे, बऱ्याच दिवसांनी इकडे आल्यामुळे माहेरपण पुरेपूर उपभोगत आहे हे वेगळं सांगायला नकोच! नुकतीच कुटुंबासह लासुरला भेट दिली. वयाची ३६ वर्षं उलटली तरी अगदी गावाजवळ असलेल्या या मंदिरात जाण्याचा योग काही आला नाही!      दर्यापूरपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर लासुर नावाचे खेडेगाव आहे, ते प्रसिद्ध आहे एका विशेष बाबी साठी, ती म्हणजे इथे असलेले आंनदेश्वर शिव मंदिर! दर्यापूर-अकोला मार्गावर असलेल्या लासुर गावात स्थित असलेल्या या मंदिरापर्यंत थेट जायला सुस्थितीतला सिमेंटचा रस्ता आहे ज्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.     विशेष आकर्षणाची गोष्ट म्हणजे हे शिवमंदिर आहे तब्बल ८०० वर्षं जुनं, १२ व्या शतकात बांधलेलं! पुरातन पण खूप सुंदर!      बऱ्यापैकी उंचावर वसलेल्या या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील रम्य आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने जरा डोकावून नजर फिरवली की सगळीकडे हिरवागार दिसतं.. झाडं.. आणि खाली पसरलेलं कुरण.. त्यात चरत असलेल्या गायी..वर पसरलेले मळभ दाटून आलेलं...

नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती

#VidarbhaDarshan - नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती शिव! अर्थात शंकर. लोप किंवा नाशाचे प्रतिक. आणि म्हणूनच नाविन्याला, सृजनाला प्रेरणा देणारे. शिवलिंगाची आराधना आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे अगदी पाच पंचवीस उंबर्‍याच्या गावांमध्येही शिवालय असतेच. या मंदिराची नावही भक्तांनी प्रेमाने ठेवलेली. कुठे हा सोमेश्वर, कुठे कोंडेश्वर, कुठे आदिनाथ. अशी कितीतरी नावांनी भक्त त्याची आराधना करतात. असेच एक पुरातन सुरेख मंदिर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भातून आणि मध्यप्रदेशातून खूप भक्त इथे दर्शनाला येतात. गावाचे नावच शंकरावरून दिले आहे, नांदगाव खंडेश्वर. नांदगाव खंडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण. अमरावतीपासून अवघे ३६ किमी अंतरावर ४५० उंबर्‍याच्या गावात मध्यवस्तीत शंकराचे एक मंदिर आहे. त्याला म्हणतात खंडेश्वर. खंडेश्वर गावात मध्यवस्तीत आल्यावर एक उंच टेकाड आहे. वर जाण्यासाठी पूर्वी येथे दगडी पायर्‍या होत्या. आता तिथे सिमेंटच्या पायर्‍या बांधल्या आहेत. या २५-३० पायर्‍या वर चढून गेलं की एक काळ्या दगडांचा भव्य परकोट लागतो. या परकोटामधून आत शिरले की प्रशस्त प्रांगणाच्य...

कोंडेश्वर मंदिर, अमरावती

#VidarbhaDarshan - कोंडेश्वर मंदिर, अमरावती कोंडेश्वर मंदिर हे भगवान शिवाला अर्पण केले आहे. हे मंदीर प्राचीन हत्‍ती मंदीराच्‍या बाजुला जंगला मधोमध आहे. हया मंदीराचे बांधकाम वास्‍तुशास्‍त्रीय हेमाडपंथीय पध्‍दतीने आणी काळया दगडांनी बांधले. महाशिवरात्री हा महत्‍वाचा सण या मंदीरात साजरा केला जातो. श्री. खटेश्‍वर महाराज समाधी, तलाव, पाण्‍याचा धबधबा मंदीराच्‍या सभोवताल आहे.

आनंदेश्वर मंदिर, लासूर

#VidarbhaDarshan - आनंदेश्वर मंदिर, लासूर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले लासूरचे आनंदेश्वेर मंदिर अमरावती जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव आहे. दर्यापूर तालुका मुख्यालयापासून अकोला मार्गावर १२ कि.मी. अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर लासूर नावाचे एक छोटेसे गाव आहे. गावाच्या दक्षिण दिशेला हेमाडपंथी प्राचीनकलेचा अप्रितम नमुना असलेले शिवमंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जागृत शिवलिंगाची स्थापना केली आहे. १२ व्या शतकात बांधलेले हे शिवमंदिर आनंदेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते. सद्यस्थितीत जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या तीन शाबूत हेमाडपंथी मंदिरांपैकी अग्रगण्य असलेले हे मंदिर ३५०० चौ. फुटांच्या अतिभव्य दगडी बांधकामात आहे. वरुन स्वस्तिक आकार असणाऱ्या या मंदिराला कळस नाही. हे मंदिर अष्टकोनी असून समोरच्या भागाकडून एखाद्या भल्यामोठ्या रथाला हत्ती जुंपल्यासारखे दिसते. या मंदिराचा दर्शनी भाग उत्तरेकडे असून दारे व खिडक्या पुर्व-पश्चिम व उत्तर दिशेला आहेत. संपुर्ण मंदिराचे बांधकाम एकावर एक दगडी शिळा रचून नंतर त्यावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या आतील भागात १२ खुले व भिंतीमधील ६ असे एकूण १८ खांब आह...

हौज कटोरा - अचलपूर

हौज कटोरा - अचलपूर, जिल्हा अमरावती अचलपूरचा इतिहास म्हणजेच वऱ्हाडचा इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा) आता पार बदलून गेले आहे. संपन्नतेची साक्ष पटवणाऱ्या खुणा तेवढय़ा शिल्लक आहेत, इतकी ती संपन्नता लयास गेली आहे. या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते. अचलपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील हौज कटोरा ही वैशिष्टय़पूर्ण षट्कोणी इमारत अहमद शहावली बहामनी याने बांधली. सुमारे १०० मीटर व्यासाच्या तलावात ८१ फूट उंचीची तीन मजली इमारत उभारण्यात आली. पूर्वी ही इमारत पाच मजली होती. त्यातील तिसरा आणि चौथा मजला पाडून त्याच्या दगडांपासून नबाबाने त्याचा राजवाडा बांधला, असे सांगितले जाते पण, ही आगळी वेगळी जीर्ण अवस्थेतील वास्तू आडवाटेने येणाऱ्या पर्यटकांचे आजही लक्ष वेधून घेते.

चिखलदरा

#VidarbhDarshan #चिखलदरा चिखलदर्‍याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदर्‍याच्या घाटात किंवा चिखलदर्‍याहून सेमाडोहला जाणार्‍या रस्त्यावर वाघदिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बर्‍याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही. येथील जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते. आख्यायिका - चिखलदर्‍याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दर...