मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

प्राचीन वास्तू लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भंडारेश्वर मंदिर, गडचिरोली

#VidarbhaDarshan - भंडारेश्वर मंदिर, गडचिरोली भंडारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड गावाच्या पश्चिमेला असलेले एक प्राचीन मंदिर आहे. खोब्रागडी व वेनलोच्चा नद्यांच्या संगमाच्या उंचवट्यांवर हे मंदिर स्थित आहे. येथे भगवान शिवाचे शिवलिंग आहे, प्रवेशद्वारात नंदी आहे. हे मंदिर दर्जेदार वास्तूचे एक उत्तम उदाहरण आहे आणि भिंती वर सुंदर आणि रेखीव कोरीव काम आहे त्यावरून हे मंदिर हेमाडपंथी काळखंडातील समजल्या जाते. महाशिवरात्रीला येथे दूरदूर हून लोक एकत्र होतात. मंदिरात नैसर्गिक प्रतिध्वनी प्रणाली आहे.

गोरजाई माता मंदिर, गडचिरोली

#VidarbhaDarshan - गोरजाई माता मंदिर, गडचिरोली गोरजाई मंदिर हे गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड येथे आहे. देवी गोराजियाच्या दर्शनासाठी खूप भाविक येथे येत असतात. हे मंदिर वैरागड किल्ल्याच्या दक्षिणेला आणि खोब्रागडी व वेनलोच्चा नद्यांच्या संगमाजवळील आहे. मंदिराची वास्तुशिल्पाची स्थिती विलक्षण स्थितीत आहे आणि त्याची छत अठरा खांबांवर आहे. वैरागड येथे असलेल्या दोन हेमाडपंथी मंदिरापैकी हे एक आहे, पण या मंदिराची सध्या दुरावस्था झालेली आहे.

कमळेश्वर मंदिर, लोहारा

#VidarbhaDarshan - कमळेश्वर मंदिर, लोहारा यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा येथील छोट्याशा गावात पुरातन महादेव मंदिर अस्तित्वात आहे, हे मंदिर जवळपास 1100 वर्षे जुने आहे. अमरावती रोडवर यवतमाळ पासून अवघ्या 5कि.मी. अंतरावर लोहारा हे गांव आहे. अमरावतीला जातांना अगदी रस्त्यावरून येथील महादेवाचे हेमांडपंथी मंदिर दिसते. हे मंदिर यादवकालीन असून यादवांचे प्रधान हेमाद्री यांनी त्याची बांधणी केल्याचे मंदिराच्या धाटणीवरून लक्षात येते. हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा उकृष्ट नमुना असल्याचे दिसून येते. ह्या मंदिराचा परिसर अत्यंत प्रसन्न व शांत आहे. अशा या मंदिरातील महादेवाची उंच पिंड बघायला मिळते. महादेवाच्या पिंडीसमोरील श्री गणेशाचे विलोभनीय रूप आपणास पाहावयास मिळते. महाशिवरात्रीला येथे भक्तांची गर्दी जमते. हे प्राचीन मंदिर निसर्गरम्य परिसरात असल्यामुळे  भक्तांना एक अद्भुत शांती चा अनुभव देते.

नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती

#VidarbhaDarshan - नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती शिव! अर्थात शंकर. लोप किंवा नाशाचे प्रतिक. आणि म्हणूनच नाविन्याला, सृजनाला प्रेरणा देणारे. शिवलिंगाची आराधना आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे अगदी पाच पंचवीस उंबर्‍याच्या गावांमध्येही शिवालय असतेच. या मंदिराची नावही भक्तांनी प्रेमाने ठेवलेली. कुठे हा सोमेश्वर, कुठे कोंडेश्वर, कुठे आदिनाथ. अशी कितीतरी नावांनी भक्त त्याची आराधना करतात. असेच एक पुरातन सुरेख मंदिर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भातून आणि मध्यप्रदेशातून खूप भक्त इथे दर्शनाला येतात. गावाचे नावच शंकरावरून दिले आहे, नांदगाव खंडेश्वर. नांदगाव खंडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण. अमरावतीपासून अवघे ३६ किमी अंतरावर ४५० उंबर्‍याच्या गावात मध्यवस्तीत शंकराचे एक मंदिर आहे. त्याला म्हणतात खंडेश्वर. खंडेश्वर गावात मध्यवस्तीत आल्यावर एक उंच टेकाड आहे. वर जाण्यासाठी पूर्वी येथे दगडी पायर्‍या होत्या. आता तिथे सिमेंटच्या पायर्‍या बांधल्या आहेत. या २५-३० पायर्‍या वर चढून गेलं की एक काळ्या दगडांचा भव्य परकोट लागतो. या परकोटामधून आत शिरले की प्रशस्त प्रांगणाच्य...

कोंडेश्वर मंदिर, अमरावती

#VidarbhaDarshan - कोंडेश्वर मंदिर, अमरावती कोंडेश्वर मंदिर हे भगवान शिवाला अर्पण केले आहे. हे मंदीर प्राचीन हत्‍ती मंदीराच्‍या बाजुला जंगला मधोमध आहे. हया मंदीराचे बांधकाम वास्‍तुशास्‍त्रीय हेमाडपंथीय पध्‍दतीने आणी काळया दगडांनी बांधले. महाशिवरात्री हा महत्‍वाचा सण या मंदीरात साजरा केला जातो. श्री. खटेश्‍वर महाराज समाधी, तलाव, पाण्‍याचा धबधबा मंदीराच्‍या सभोवताल आहे.

आनंदेश्वर मंदिर, लासूर

#VidarbhaDarshan - आनंदेश्वर मंदिर, लासूर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले लासूरचे आनंदेश्वेर मंदिर अमरावती जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव आहे. दर्यापूर तालुका मुख्यालयापासून अकोला मार्गावर १२ कि.मी. अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर लासूर नावाचे एक छोटेसे गाव आहे. गावाच्या दक्षिण दिशेला हेमाडपंथी प्राचीनकलेचा अप्रितम नमुना असलेले शिवमंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जागृत शिवलिंगाची स्थापना केली आहे. १२ व्या शतकात बांधलेले हे शिवमंदिर आनंदेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते. सद्यस्थितीत जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या तीन शाबूत हेमाडपंथी मंदिरांपैकी अग्रगण्य असलेले हे मंदिर ३५०० चौ. फुटांच्या अतिभव्य दगडी बांधकामात आहे. वरुन स्वस्तिक आकार असणाऱ्या या मंदिराला कळस नाही. हे मंदिर अष्टकोनी असून समोरच्या भागाकडून एखाद्या भल्यामोठ्या रथाला हत्ती जुंपल्यासारखे दिसते. या मंदिराचा दर्शनी भाग उत्तरेकडे असून दारे व खिडक्या पुर्व-पश्चिम व उत्तर दिशेला आहेत. संपुर्ण मंदिराचे बांधकाम एकावर एक दगडी शिळा रचून नंतर त्यावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या आतील भागात १२ खुले व भिंतीमधील ६ असे एकूण १८ खांब आह...

हौज कटोरा - अचलपूर

हौज कटोरा - अचलपूर, जिल्हा अमरावती अचलपूरचा इतिहास म्हणजेच वऱ्हाडचा इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा) आता पार बदलून गेले आहे. संपन्नतेची साक्ष पटवणाऱ्या खुणा तेवढय़ा शिल्लक आहेत, इतकी ती संपन्नता लयास गेली आहे. या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते. अचलपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील हौज कटोरा ही वैशिष्टय़पूर्ण षट्कोणी इमारत अहमद शहावली बहामनी याने बांधली. सुमारे १०० मीटर व्यासाच्या तलावात ८१ फूट उंचीची तीन मजली इमारत उभारण्यात आली. पूर्वी ही इमारत पाच मजली होती. त्यातील तिसरा आणि चौथा मजला पाडून त्याच्या दगडांपासून नबाबाने त्याचा राजवाडा बांधला, असे सांगितले जाते पण, ही आगळी वेगळी जीर्ण अवस्थेतील वास्तू आडवाटेने येणाऱ्या पर्यटकांचे आजही लक्ष वेधून घेते.

विदर्भातील दुर्लक्षित "ताजमहाल"

विदर्भातील दुर्लक्षित "ताजमहाल" चंद्रपूर येथील गोंडराजे 'राजा बिरशहा' यांचे निधना नंतर त्यांचे आठवणीखातीर 'राणी हिराई' ने बांधलेली सुंदर वास्तू खऱ्या अर्थाने 'प्रेमाचे प्रतीक' आहे। "एखाद्या राणीने राजाच्या आठवणीखातीर बांधलेली एकमेव वास्तू असावी...." राजा बिरशाह यांची समाधी (सुंदर वास्तू) राणी हिराई ने बांधून त्यांच्या प्रति असलेले प्रेम आपल्या कार्यातून अजरामर केले. या निरागस प्रेमाचा इतिहास बघितला पाहिजे, युवकांनी क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, आपल्या विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्याकरिता 'विशिष्ट' दिवसाची गरज नसून ते आपल्या वागणुकीतून नि कार्यातून व्यक्त व्हायला पाहिजे, याकरिता प्रेमदिनाचे पाश्चिमात्य प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न म्हणून दरवर्षी 'इको-प्रो संस्था, चंद्रपूर व एफ ई एस महिला महाविद्यालय, चंद्रपूर यांचे वतीने 'राजा बिरशाह' यांच्या समाधीवर पुष्पअर्पण करून इतिहासाच उजाळा दिला जातो विदर्भाची ओळख जगाच्या नकाशावर Tiger capital of india अशीच आहे त्यात ताडोबा हे वाघ बघायचे असल्या...

प्राचीन चिंतामणी मंदिर, कोथळी

#VidarbhaDarshan - प्राचीन चिंतामणी मंदिर, कोथळी (भाग - १) बुलढाणा जिल्ह्यांतील मोताळा तालुक्यातील कोथळी येथे मनाला आकर्षित करणारे हेमाडपंथी शिवालय (चिंतामणी मंदिर) या नावाने ओळखण्यात येते. या मंदिराचे बांधकाम पुरातन कोरीव पद्धतीचे असून, एकरूपता जाणवते. प्रवेशद्वारासमोर शंकराचे वाहन असलेले नंदी विराजमान आहे. या नंदीच्या अंगावर विशिष्ट कलाकुशलतेने कोरलेली अखंड साखळी घंटा आहे. मंदिराचे खांब दगडी आहे. या मंदिराचे बांधकाम १३ व्या शतकातील असावे, असा जाणकाराचा अंदाज आहे. कोथळी गावाची अस्मिता जपणारे हे एक प्राचीन शिवालय आहे. मंदिराच्या गाभार्‍यात महादेवाची तेजस्वी शिवलिंगाची स्थापना आहे. या पिंडीचा गुळगुळीतपणा मनाला प्रफुल्लित करणारा असून, समोर सभामंडप असून, अखंड दगडामध्ये कोरलेल्या मूर्ती आहे. यावरून हे लक्षात येते की त्यावेळेस शिल्पकला अवगत होती. मंदिराच्या मागून वाहणारी विश्‍वगंगा नदी सौंदर्यात आणखी भर घालते. संध्याकाळी लालबुंद झालेला सूर्य मावळतीला असताना आपले प्रकाशकिरण पिंडीवर पडतो. तर सकाळी उगवताना गावातील पिंडीवर पाडतो. सूर्यकिरणे वेधून घेणारी हे शिवलिंग आहे गावातील व गावाबाहेरी...

प्राचीन मशिद रोहिणखेड

#VidarbhaDarshan - प्राचीन मशिद, रोहिणखेड बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यापासून १२ कि.मी. अंतरावरील रोहिणखेड हे प्रसिद्ध तथा पुरातन वस्ती असणारे गाव आहे. येथे स्थापत्य कलेचा विलोभनीय उदाहरण असलेली मशीद आहे. एकेकाळी निजामशाहीत राजधानीचे शहर म्हणून रोहिणखेड गावाला रोहिणाबाद अशी ओळख होती. या ठिकाणी सन १८८२ मध्ये खुदावतखाँ महमद यांनी बांधलेली पुरातन मशीद आहे. या मशीदीच्या भिंतीवर कुराणाच्या आयत आरेबिक भाषेत लिहिल्या आहेत. या भिंतीवरील आयतांवरून ओले कापड फिरविल्यास लाल अक्षरातील अक्षरे दिसतात व ओलावा नाहीसा झाला की अक्षरे लुप्त होतात. आजही दर शुक्रवारी विशेष नमाज पठन या ठिकाणी केल्या जाते. या मशीदीचे बांधकाम संपूर्ण दगडामध्ये झाले असून, कला कृतीचा उत्तम नमुना ही मशीद प्रसिद्ध आहे. त्यामुळे या मशीदीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. रोहिणखेड गावात या मशीदीसह अनेक ठिकाणी पुरातन वास्तुंचा ठेवा आहे. येथे दोन मोठय़ा लढाया झाल्याचा इतिहास आहे. सन १४३७ च्या सुमारास खान्देशचा सुलतान नजिरखानने त्याचा जावई अल्लाउद्दीन बहामनीवर स्वारी केली. सन १९५0 च्या सुमारास अहमदनगरच्या राजकुमार बुरहानने...