मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मंगरूळपीर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सुफी संत दादा हयात कलंदर दर्गा, मंगरूळपीर, वाशिम

  #VidarbhaDarshan - सुफी संत दादा हयात कलंदर दर्गा, मंगरूळपीर, वाशिम  वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी एक मंगरूळ पीर. ‘मंगलपूर’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘मंगरूळ’ हे नाव तयार झाल्याचे सांगितले जाते. या शहराच्या नावाला ‘पीर’ हा शब्द लागण्याचे कारण म्हणजे येथील सुप्रसिद्ध पीराचा दर्गा. या शहरातील विविधधर्मांच्या लोकांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत. मला येथील सर्वात  जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे दरवर्षी होणारी जत्रा. ही जत्रा दहा दिवस चालते. या जत्रेत मोठमोठाले पाळणे, विविध वस्तूंची दुकाने तसेच खाद्यपदार्थांचे गाडे असतात. टुरिंग टॉकीजेस तसेच खेळांची दुकानेदेखील असतात. सर्कशीसारख्या थरारक गोष्टी असतात. प्रत्येकाने एकदातरी ही जत्रा अनुभवावी असे मला वाटते. हे शहर एक आध्यात्मिक भूमी आहे. या शहरातील पीराचा दर्गा हा सुफी संत दादा हयात कलंदर यांचा आहे. जगात जे तीन कलंदर होऊन गेले त्यांपैकी हे एक. विंध्य ओलांडून येणारी ही पहिली मुस्लीम व्यक्ती. खुद्द औरंगजेबाने या दर्ग्याला देणगी दिल्याची नोंद आहे.हा दर्गा म्हणजे अतिशय सुंदर व प्रेक्षणीय  स्थळ आहे. तसेच या शहरात ब्रिटिशांच्या काळात...