मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जयपूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मिर्झा राजे जयसिंग यांनी बांधलेली ऐतिहासिक पायविहिर, जयपूर, बुलढाणा

#VidarbhaDarshan - मिर्झा राजे जयसिंग यांनी बांधलेली ऐतिहासिक पायविहिर, जयपूर, बुलढाणा  बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताळा तालुक्यातील जयपूर हे छोटं ऐतिहासिक गाव. मिर्झा राजे जयसिंग विदर्भ दौर्यावर असताना काही काळ जयपूर येथे वास्तव्यास होते. त्यांनी येथे पायरी विहीर आणि छत्री बांधली. छत्री सध्या अस्तित्वात नाही. पण विहीर मात्र अजून तग धरुन जयसिंगांची साक्ष म्हणून आहे.  ही पुरातन विहीर अष्टकोणी आहे. विहीरीचा खालील भाग दगडात बांधलेला आहे. आणि वरील भाग जुन्या काळातील चपट्या विटांनी बांधलेला आहे. विहीरीच्या आत खोल्या आहेत. विहीरीत उतरण्यासाठी दोन बाजूंनी पायर्या आहेत. विहीर अजून सुस्थितीत आहे, साफसफाई आणि डागडुजी केल्यास सुंदरता वाढेल. जयपूर हे ऐतिहासिक गाव आहे. येथे मिर्झा राजे जयसिंगांच्या खाणाखुणा सापडतात. गावाच्या पुर्व दिशेला सुर्य मंदिर आहे. विहीर परिसरात तीन प्राचीन समाधी होत्या, त्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. आधी जयपूर आणि कोथळी एकच गाव होते. जयपूर हे नाव जयसिंग यांच्या नावावरुनच ठेवले गेले आहे. जवळच गोसिंग गाव आहे त्या गावाचा संबंध सुध्दा जयसिंगाशी असावा. जयसिंगांचे मुळ ग...

हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक गाव जयपूर

#VidarbhaDarshan - हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक गाव जयपूर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जयपूर गाव हे गाव हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. या गावात मंदिर आणि मशीद एकाच ठिकाणी आहेत, अगदी भिंतीला भिंत लागून आहेत, तरीही आजवर इथे कधी सामाजिक दंगल किंवा धार्मिक तनाव निर्माण झाला नाही. सर्व हिंदू आणि मुस्लिम मिळून मिसळून राहतात. मोताळा तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या जयपूर गावात हनुमान मंदिर आणि मशीद एकाच ठिकाणी आहेत. एकीकडे मशीदीत अजान - नमाज अदा केली जाते तर दूसरीकडे मंदिरात घंटांच्या नादात बजरंग बलीचा जयघोष चालू असतो. भक्तीचा मार्ग जरी वेगवेगळा असला तरी सर्वांची श्रद्धा एक आहे. मंदिर आणि मशीद जवळ एक वटा बांधलेला आहे, जिथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक एकत्र बसून विचारांची देवाणघेवाण करतात. हिंदू आणि मुस्लिम एकमेकांच्या लग्न कार्यात सहभागी होतात. दसरा - दिवाळीला मुस्लिम लोक हिंदूना आलिंगन देऊन शुभेच्छा देतात, हिंदू लोक त्यांना फराळाला घरी नेतात. याचप्रमाणे ईद साजरी केली जाते. हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना ईद मुबारक देतात, मुस्लिम बांधव ही हिंदू...