मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कोळेश्वर मंदिर, रोहिणखेड

#VidarbhaDarshan - कोळेश्वर मंदिर, रोहिणखेड बुलढाणा जिल्ह्यांत मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे अस्तित्वात असलेले प्राचीन शिव मंदिर हे कोळेश्वर नावाने ओळखले जाते. मोताळा तालुक्यापासून १२ कि.मी. अंतरावरील रोहिणखेड हे प्रसिद्ध तथा पुरातन वस्ती असणारे गाव आहे. कोळेश्वर मंदिर प्राचीन असून हेमाडपंथी शैली मध्ये मंदिराचे बांधकाम केलेले आहे. मंदिराच्या स्तंभावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्यात महादेवाची पिंड आहे, ही पिंड महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवलिंग म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात येथे भक्तांची गर्दी जमते. रोहिणखेड गावात या कोळेश्वर मंदिरासह अनेक ठिकाणी पुरातन वास्तुंचा ठेवा आहे. येथे स्थापत्य कलेचा विलोभनीय उदाहरण असलेली मशीद आहे. एकेकाळी निजामशाहीत राजधानीचे शहर म्हणून रोहिणखेड गावाला रोहिणाबाद अशी ओळख होती. येथे दोन मोठय़ा लढाया झाल्याचा इतिहास आहे. सन १४३७ च्या सुमारास खान्देशचा सुलतान नजिरखानने त्याचा जावई अल्लाउद्दीन बहामनीवर स्वारी केली. सन १९५0 च्या सुमारास अहमदनगरच्या राजकुमार बुरहानने खान्देशचा राजा अलिखानच्या बरोबर जमालखानवर याच ठिकाणी युद्ध केल्या...

हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक गाव जयपूर

#VidarbhaDarshan - हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक गाव जयपूर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जयपूर गाव हे गाव हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. या गावात मंदिर आणि मशीद एकाच ठिकाणी आहेत, अगदी भिंतीला भिंत लागून आहेत, तरीही आजवर इथे कधी सामाजिक दंगल किंवा धार्मिक तनाव निर्माण झाला नाही. सर्व हिंदू आणि मुस्लिम मिळून मिसळून राहतात. मोताळा तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या जयपूर गावात हनुमान मंदिर आणि मशीद एकाच ठिकाणी आहेत. एकीकडे मशीदीत अजान - नमाज अदा केली जाते तर दूसरीकडे मंदिरात घंटांच्या नादात बजरंग बलीचा जयघोष चालू असतो. भक्तीचा मार्ग जरी वेगवेगळा असला तरी सर्वांची श्रद्धा एक आहे. मंदिर आणि मशीद जवळ एक वटा बांधलेला आहे, जिथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक एकत्र बसून विचारांची देवाणघेवाण करतात. हिंदू आणि मुस्लिम एकमेकांच्या लग्न कार्यात सहभागी होतात. दसरा - दिवाळीला मुस्लिम लोक हिंदूना आलिंगन देऊन शुभेच्छा देतात, हिंदू लोक त्यांना फराळाला घरी नेतात. याचप्रमाणे ईद साजरी केली जाते. हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना ईद मुबारक देतात, मुस्लिम बांधव ही हिंदू...

भंडारेश्वर मंदिर, गडचिरोली

#VidarbhaDarshan - भंडारेश्वर मंदिर, गडचिरोली भंडारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड गावाच्या पश्चिमेला असलेले एक प्राचीन मंदिर आहे. खोब्रागडी व वेनलोच्चा नद्यांच्या संगमाच्या उंचवट्यांवर हे मंदिर स्थित आहे. येथे भगवान शिवाचे शिवलिंग आहे, प्रवेशद्वारात नंदी आहे. हे मंदिर दर्जेदार वास्तूचे एक उत्तम उदाहरण आहे आणि भिंती वर सुंदर आणि रेखीव कोरीव काम आहे त्यावरून हे मंदिर हेमाडपंथी काळखंडातील समजल्या जाते. महाशिवरात्रीला येथे दूरदूर हून लोक एकत्र होतात. मंदिरात नैसर्गिक प्रतिध्वनी प्रणाली आहे.

गोरजाई माता मंदिर, गडचिरोली

#VidarbhaDarshan - गोरजाई माता मंदिर, गडचिरोली गोरजाई मंदिर हे गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड येथे आहे. देवी गोराजियाच्या दर्शनासाठी खूप भाविक येथे येत असतात. हे मंदिर वैरागड किल्ल्याच्या दक्षिणेला आणि खोब्रागडी व वेनलोच्चा नद्यांच्या संगमाजवळील आहे. मंदिराची वास्तुशिल्पाची स्थिती विलक्षण स्थितीत आहे आणि त्याची छत अठरा खांबांवर आहे. वैरागड येथे असलेल्या दोन हेमाडपंथी मंदिरापैकी हे एक आहे, पण या मंदिराची सध्या दुरावस्था झालेली आहे.

कमळेश्वर मंदिर, लोहारा

#VidarbhaDarshan - कमळेश्वर मंदिर, लोहारा यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा येथील छोट्याशा गावात पुरातन महादेव मंदिर अस्तित्वात आहे, हे मंदिर जवळपास 1100 वर्षे जुने आहे. अमरावती रोडवर यवतमाळ पासून अवघ्या 5कि.मी. अंतरावर लोहारा हे गांव आहे. अमरावतीला जातांना अगदी रस्त्यावरून येथील महादेवाचे हेमांडपंथी मंदिर दिसते. हे मंदिर यादवकालीन असून यादवांचे प्रधान हेमाद्री यांनी त्याची बांधणी केल्याचे मंदिराच्या धाटणीवरून लक्षात येते. हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा उकृष्ट नमुना असल्याचे दिसून येते. ह्या मंदिराचा परिसर अत्यंत प्रसन्न व शांत आहे. अशा या मंदिरातील महादेवाची उंच पिंड बघायला मिळते. महादेवाच्या पिंडीसमोरील श्री गणेशाचे विलोभनीय रूप आपणास पाहावयास मिळते. महाशिवरात्रीला येथे भक्तांची गर्दी जमते. हे प्राचीन मंदिर निसर्गरम्य परिसरात असल्यामुळे  भक्तांना एक अद्भुत शांती चा अनुभव देते.

नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती

#VidarbhaDarshan - नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती शिव! अर्थात शंकर. लोप किंवा नाशाचे प्रतिक. आणि म्हणूनच नाविन्याला, सृजनाला प्रेरणा देणारे. शिवलिंगाची आराधना आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे अगदी पाच पंचवीस उंबर्‍याच्या गावांमध्येही शिवालय असतेच. या मंदिराची नावही भक्तांनी प्रेमाने ठेवलेली. कुठे हा सोमेश्वर, कुठे कोंडेश्वर, कुठे आदिनाथ. अशी कितीतरी नावांनी भक्त त्याची आराधना करतात. असेच एक पुरातन सुरेख मंदिर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भातून आणि मध्यप्रदेशातून खूप भक्त इथे दर्शनाला येतात. गावाचे नावच शंकरावरून दिले आहे, नांदगाव खंडेश्वर. नांदगाव खंडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण. अमरावतीपासून अवघे ३६ किमी अंतरावर ४५० उंबर्‍याच्या गावात मध्यवस्तीत शंकराचे एक मंदिर आहे. त्याला म्हणतात खंडेश्वर. खंडेश्वर गावात मध्यवस्तीत आल्यावर एक उंच टेकाड आहे. वर जाण्यासाठी पूर्वी येथे दगडी पायर्‍या होत्या. आता तिथे सिमेंटच्या पायर्‍या बांधल्या आहेत. या २५-३० पायर्‍या वर चढून गेलं की एक काळ्या दगडांचा भव्य परकोट लागतो. या परकोटामधून आत शिरले की प्रशस्त प्रांगणाच्य...

कोंडेश्वर मंदिर, अमरावती

#VidarbhaDarshan - कोंडेश्वर मंदिर, अमरावती कोंडेश्वर मंदिर हे भगवान शिवाला अर्पण केले आहे. हे मंदीर प्राचीन हत्‍ती मंदीराच्‍या बाजुला जंगला मधोमध आहे. हया मंदीराचे बांधकाम वास्‍तुशास्‍त्रीय हेमाडपंथीय पध्‍दतीने आणी काळया दगडांनी बांधले. महाशिवरात्री हा महत्‍वाचा सण या मंदीरात साजरा केला जातो. श्री. खटेश्‍वर महाराज समाधी, तलाव, पाण्‍याचा धबधबा मंदीराच्‍या सभोवताल आहे.