मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ज्ञानगंगा अभयारण्य, बुलढाणा

#VidarbhaDarshan - ज्ञानगंगा अभयारण्य, बुलढाणा (बोथा) ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात असलेले बोथा गाव जुने वनग्राम आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार, हे अभयारण्य ३३०३४.०२ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावर पसरले आहेत. या अभयारण्यात वेगवेगळ्या जातींचे हजारो वन्यप्राणी आहेत अत्यंत निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात पर्यावरण प्रेमींना सुखद अनुभव प्राप्त करून देणारे अनेक रमणीय स्थळे आहे. याशिवाय बिबट्या, हरिण, काळविटसारखे अनेक वन्यप्राणी, विविध जातींचे पक्षी तथा वृक्षवल्ली पाहून पर्यटकांचे मन मोहून जाते. ज्ञानगंगा अभयारण्य बुलडाणा शहरापासून केवळ 15 तर किमी अंतरावर आहे.

नरनाळा वन्यजीव अभयारण्य

#VidarbhaDarshan - नरनाळा वन्यजीव अभयारण्य २ मे, १९९७ रोजी नरनाळा किल्ला व त्याच्या आजूबाजूचे घनदाट जंगल ‘नरनाळा वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. अकोल्यापासून ६० कि.मी. अंतरावर, सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये नरनाळा अभयारण्य वसले आहे. हे अभयारण्य अकोट तालुक्यात असून, १२.३५ चौ.कि.मी. क्षेत्रावर पसरले आहे. येथील तापमान ३५ ते ४३ अंश सेल्सिअस असते. वर्षभरात येथे ५०० ते ९०० मि.मी. पाऊस पडतो. या अभयारण्यात  सांबर, बिबट्या, तसेच बार्किंग डिअर (विशिष्ट जातीचे हरीण) हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. ह्या अभयारण्यस ऐतिहासिक, जैविक, पौराणिक व पुरातत्त्वशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थान असून हे पर्यटकांसाठी एक आकर्षणकेंद्र बनले आहे. अभयारण्यास जाण्याचा मार्ग - अकोटपासून नागपूर विमानतळ २७० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यापासून अकोला रेल्वे स्टेशन ६५ कि.मी. अंतरावर आहे, तर अकोट मीटर गेज रेल्वे स्टेशन २० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यास जायला अकोट व अकोल्यापासून बस व टॅक्सीदेखील उपलब्ध आहेत. ऑक्टोबर ते मे हे दिवस अभयारण्यास भेट दे़ण्यास उत्तम आहेत.  शहानूर गाव हे या अभयारण्य...

हौज कटोरा - अचलपूर

हौज कटोरा - अचलपूर, जिल्हा अमरावती अचलपूरचा इतिहास म्हणजेच वऱ्हाडचा इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा) आता पार बदलून गेले आहे. संपन्नतेची साक्ष पटवणाऱ्या खुणा तेवढय़ा शिल्लक आहेत, इतकी ती संपन्नता लयास गेली आहे. या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते. अचलपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील हौज कटोरा ही वैशिष्टय़पूर्ण षट्कोणी इमारत अहमद शहावली बहामनी याने बांधली. सुमारे १०० मीटर व्यासाच्या तलावात ८१ फूट उंचीची तीन मजली इमारत उभारण्यात आली. पूर्वी ही इमारत पाच मजली होती. त्यातील तिसरा आणि चौथा मजला पाडून त्याच्या दगडांपासून नबाबाने त्याचा राजवाडा बांधला, असे सांगितले जाते पण, ही आगळी वेगळी जीर्ण अवस्थेतील वास्तू आडवाटेने येणाऱ्या पर्यटकांचे आजही लक्ष वेधून घेते.

चिखलदरा

#VidarbhDarshan #चिखलदरा चिखलदर्‍याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदर्‍याच्या घाटात किंवा चिखलदर्‍याहून सेमाडोहला जाणार्‍या रस्त्यावर वाघदिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बर्‍याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही. येथील जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते. आख्यायिका - चिखलदर्‍याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दर...

टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

#VidarbhaDarshan - टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य टिपेश्वर वन्यजीव अभ्यारण्य हे क्षेत्रात टिपेश्वर गावाजवळील 'देवी टिपई' या नावाने ओळखले जाते. हे यवतमाळ जिल्ह्याच्या पांडरकवडा वन विभागातील पाटणबोरी आणि परवा पर्वतरांगेत वसलेले आहे. टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यातील पांडर्कवाडा तालुक्यात आहे. अभयारण्य सुमारे 148.63 वर्ग कि.मी.चे क्षेत्रफळ समाविष्ट आहे. अभयारण्यभोवती छोटी गावे आहेत आणि त्यामुळे लोक लाकूड इ. इंधनासाठी जंगलावर अवलंबून आहेत. हे ठिकाण अगदी डोंगराळ आणि अलंकारयुक्त आहे आणि अशा प्रकारे विविध प्रकारचे वनस्पतींचे आवरण हे समुद्रसपाटीपासून भिन्न आहे. अभयारण्यात हिना, चित्तल, ब्लॅक हकी, सांबर, जाक, जंगली डुक्कर, मयूर, ब्लू बैल, जंगली मांजर, अस्वल आणि बर्याचशा जनावरांचा समावेश आहे. राहण्याची सोय - पंढरकावाडा येथे राहण्याची विश्रामगृहे आहेत. रेल्वे सेवा - जवळचे रेल्वे स्थानक आदिलबाद (35 कि.मी.) येथे आहे. विमानतळ - सर्वात जवळचे विमानतळ नागगाव, 17 9 कि.मी. रोड - अभयारण्य पंढरकावडा मार्गे सहजतेने जाता येते. उत्कृष्ट हंगाम - एप्रिल-मे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे ...

लोणार सरोवर, बुलढाणा

#VidarbhaDarshan - लोणार सरोवर लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खार्‍या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती एक उल्केमुळे झाली. उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर असून औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या सरोवराची निर्मिती मंगळावरील अशनी आदळल्याने झाली असावी असा दावा काही संशोधक करतात. हा दावा प्रबळ करणारा पुरावा डॉ. तांबेकर यांच्या या संशोधनामुळे सापडला आहे. सुमारे पन्नास हजार वर्षांपूवीर्च्या या सरोवरात मंगळावरील विषाणू सापडला असून 'बेसिलस ओडीसी' असे त्याचे नाव आहे. इ.स. २००४ मध्ये नासाच्या अंतराळयानाने मंगळावरील मोहिमेत या विषाणूचे अस्तित्त्व शोधले होते. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत.

दीक्षा भूमी नागपूर

दीक्षा भूमी नागपूर जगभरातील बौद्ध बांधवांचे हे अतिशय पवित्र आणि श्रद्धेचे ठिकाण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे 3 लाख 80 हजार अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बोद्ध धम्म स्वीकारला होता. त्यांनी स्वीकारलेली ही दीक्षा आजही देशातील असंख्य लोकांसाठी प्रेरणादायी आहे. भारतातील भीमबांधवांसाठी दीक्षाभूमी हे श्रद्धास्थळच आहे. प्रत्येक वर्षी अशोक विजया दशमी आणि 14 ऑक्टोबर रोजी (बाबासाहेबांनी दीक्षा स्वीकारली तो दिवस) येथे लाखो बौद्ध बांधव भेट देत असतात. या जागेवर भव्य स्तूप उभारण्यात आलेला आहे. भारतातील भीमबांधवांसाठी दीक्षाभूमी हे श्रद्धास्थळच आहे. प्रत्येक वर्षी अशोक विजया दशमी आणि 14 ऑक्टोबर रोजी (बाबासाहेबांनी दीक्षा स्वीकारली तो दिवस) येथे लाखो बौद्ध बांधव भेट देत असतात. या जागेवर भव्य स्तूप उभारण्यात आलेला आहे. जागेत बौद्धधमांची दीक्षा स्वीकारतात, ती जागा. बाबासाहेबांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दोन जागांपैकी एके दीक्षाभूमी असून, दुसरी म्हणजे, मुंबईतील चैत्य भूमी आहे. अतिशय सुंदर असे वास्तूशिल्प आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे संपूर्ण जगात दीक्षाभूमी प...

विदर्भातील दुर्लक्षित "ताजमहाल"

विदर्भातील दुर्लक्षित "ताजमहाल" चंद्रपूर येथील गोंडराजे 'राजा बिरशहा' यांचे निधना नंतर त्यांचे आठवणीखातीर 'राणी हिराई' ने बांधलेली सुंदर वास्तू खऱ्या अर्थाने 'प्रेमाचे प्रतीक' आहे। "एखाद्या राणीने राजाच्या आठवणीखातीर बांधलेली एकमेव वास्तू असावी...." राजा बिरशाह यांची समाधी (सुंदर वास्तू) राणी हिराई ने बांधून त्यांच्या प्रति असलेले प्रेम आपल्या कार्यातून अजरामर केले. या निरागस प्रेमाचा इतिहास बघितला पाहिजे, युवकांनी क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, आपल्या विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्याकरिता 'विशिष्ट' दिवसाची गरज नसून ते आपल्या वागणुकीतून नि कार्यातून व्यक्त व्हायला पाहिजे, याकरिता प्रेमदिनाचे पाश्चिमात्य प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न म्हणून दरवर्षी 'इको-प्रो संस्था, चंद्रपूर व एफ ई एस महिला महाविद्यालय, चंद्रपूर यांचे वतीने 'राजा बिरशाह' यांच्या समाधीवर पुष्पअर्पण करून इतिहासाच उजाळा दिला जातो विदर्भाची ओळख जगाच्या नकाशावर Tiger capital of india अशीच आहे त्यात ताडोबा हे वाघ बघायचे असल्या...

सैराट | वऱ्हाडी कट्टा

नागराज न आमच्या गावच्या मंग्याले सैराट मंदी घेतलं...🤠 कॉलेज मधला तो सिन ---🎥 (मंग्या परश्या ला मारताना) आर्ची - ए मंग्या सोड त्याला 💁🏻 मंग्या - जाय व बयाळ तोंडे नाई सोडत ...😠 आर्ची - पुन्हा त्याला हात तर लावून बघ कि ...💁🏻 मंग्या - जाय न तिकडे व .. अश्या झिपोट्या वडीन कि व माय व अन व बाबा व...व माय व कारशीन मंग...तिकडे मार ते शान ...इकडे नाई चालत ते...😣 अन जे लावला परश्या कुथाळनं ...👊🏻👋🏻🤜🏻 म्हणशीन काय मंग्या 😡 मंगेश भाऊ म्हण्या च आपल्या ले ... आर्ची पयत घरी गेली...डबल दिसलीच नाई😆🏃🏻‍♀ - वऱ्हाडी कट्टा (मंग्या) डालडा न वं ... थिजला न वं...😬 😜😂😅 Stay connected

दमदार शुक्रवार | वऱ्हाडी कट्टा

विदर्भ दर्शन या पेज वर आजपासून आपण वऱ्हाडी कट्टा हा सदर चालू करणार आहोत. या सदरातील आजची पहिली पोस्ट. ----------------------- दमदार शुक्रवार शुक्रवारी 9.30 वाजले कि बिलकुल गल्ल्या सगळ्या सामसूम ... दमदार शुक्रवार असे दूरदर्शन वर पिच्चर राये...📺 मोजून येटायात 5-6 जणाईच्या घरी टीव्ही अन अस नाई कि रंगीत ... अंह ... ब्लॅके न व्हाईट ...फक्त काया न पांढरा च कलर ...तरी अशी नवाई कि अरे रे रे ...🖥📺💻 आता 5-6 टीव्या म्हटल्यावर सगळ्याइच्या घरात टीव्ही पाया ले जात होती अस ... जो यिऊ दिन त्याच पूर घर भरेल ... 👬👨‍👧‍👧👨‍👩‍👧 बरं झाला गोइंदा चा पिच्चर चालू 9.30 ले ...10.30 -  11 लोक दोन तीन खेप जाम्बोया दिऊ दिऊ अर्दे जास्त जागीच कलंडत होते (झोप लागत होती) ... मंग कोणी त्याइच्या कानात गुदगुल्या करीन ...कोणी काना खाली मारत होते ... बिलकुल झपू देत नव्हते अश्या अर्द्या मंदात झोपणाऱ्याले ... 😆 पुरा पिच्चर पायणारे कट्टर तसे कमीच होते ... 😱बिलकुल साडे बारा एक लोक पुरा पिच्चर पायणारे पक्के होते काई ...बिलकुल डोया नाई लागे त्याईचा ... तो पिच्चर कसाइ असू द्या न मंग ...😯 बरं...