#VidarbhaDarshan - ज्ञानगंगा अभयारण्य, बुलढाणा (बोथा)
ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात असलेले बोथा गाव जुने वनग्राम आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार, हे अभयारण्य ३३०३४.०२ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावर पसरले आहेत. या अभयारण्यात वेगवेगळ्या जातींचे हजारो वन्यप्राणी आहेत
अत्यंत निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात पर्यावरण प्रेमींना सुखद अनुभव प्राप्त करून देणारे अनेक रमणीय स्थळे आहे. याशिवाय बिबट्या, हरिण, काळविटसारखे अनेक वन्यप्राणी, विविध जातींचे पक्षी तथा वृक्षवल्ली पाहून पर्यटकांचे मन मोहून जाते.
ज्ञानगंगा अभयारण्य बुलडाणा शहरापासून केवळ 15 तर किमी अंतरावर आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा