दीक्षा भूमी नागपूर
जगभरातील बौद्ध बांधवांचे हे अतिशय पवित्र आणि श्रद्धेचे ठिकाण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे 3 लाख 80 हजार अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बोद्ध धम्म स्वीकारला होता. त्यांनी स्वीकारलेली ही दीक्षा आजही देशातील असंख्य लोकांसाठी प्रेरणादायी आहे.
भारतातील भीमबांधवांसाठी दीक्षाभूमी हे श्रद्धास्थळच आहे. प्रत्येक वर्षी अशोक विजया दशमी आणि 14 ऑक्टोबर रोजी (बाबासाहेबांनी दीक्षा स्वीकारली तो दिवस) येथे लाखो बौद्ध बांधव भेट देत असतात. या जागेवर भव्य स्तूप उभारण्यात आलेला आहे.

जागेत बौद्धधमांची दीक्षा स्वीकारतात, ती जागा.
बाबासाहेबांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दोन जागांपैकी एके दीक्षाभूमी असून, दुसरी म्हणजे, मुंबईतील चैत्य भूमी आहे. अतिशय सुंदर असे वास्तूशिल्प आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे संपूर्ण जगात दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे. भारतातील पर्यटकाचेही हे मुख्य केंद्र आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा