विदर्भ दर्शन या पेज वर आजपासून आपण वऱ्हाडी कट्टा हा सदर चालू करणार आहोत.
या सदरातील आजची पहिली पोस्ट.
-----------------------
दमदार शुक्रवार
शुक्रवारी 9.30 वाजले कि बिलकुल गल्ल्या सगळ्या सामसूम ... दमदार शुक्रवार असे दूरदर्शन वर पिच्चर राये...📺
मोजून येटायात 5-6 जणाईच्या घरी टीव्ही अन अस नाई कि रंगीत ... अंह ... ब्लॅके न व्हाईट ...फक्त काया न पांढरा च कलर ...तरी अशी नवाई कि अरे रे रे ...🖥📺💻
आता 5-6 टीव्या म्हटल्यावर सगळ्याइच्या घरात टीव्ही पाया ले जात होती अस ... जो यिऊ दिन त्याच पूर घर भरेल ...
👬👨👧👧👨👩👧
बरं झाला गोइंदा चा पिच्चर चालू 9.30 ले ...10.30 - 11 लोक दोन तीन खेप जाम्बोया दिऊ दिऊ अर्दे जास्त जागीच कलंडत होते (झोप लागत होती) ... मंग कोणी त्याइच्या कानात गुदगुल्या करीन ...कोणी काना खाली मारत होते ... बिलकुल झपू देत नव्हते अश्या अर्द्या मंदात झोपणाऱ्याले ... 😆
पुरा पिच्चर पायणारे कट्टर तसे कमीच होते ... 😱बिलकुल साडे बारा एक लोक पुरा पिच्चर पायणारे पक्के होते काई ...बिलकुल डोया नाई लागे त्याईचा ... तो पिच्चर कसाइ असू द्या न मंग ...😯
बरं शांता आजी बसे बॉ काय समजत अशीन म्हटलं बॉ या बुडीले ...? हे एवढा मोठा जाड्या काचा चा चष्मा ...बरं आयकू येत होत की नाई काय माहित त्या बुडीले ... 👵🏾
गोल्या म्हणे काय समजते व आजी तुले ? 🤔
अरे नाता ते चित्र दिसते हालताना अन आवाज येते ...तेवडच बरं वाटते रे भाऊ ...मले काई समजत नाई त्यातलं ...👵🏾👈🏻आजी चा रिप्लाय 😳
बरं समजा काल राती पिच्चर पायला पोऱ्याइंनं कि दुसऱ्या दिवशी जोरदार चरचा असे त्या पिच्चर वर ... हासू हासू पिच्चर चे सिन सांगत पोरे...
तुमी राजा काई म्हणा त्या DD National वर गँग मंदी बसून जे पिच्चर पायात मजा होती, ते या एसी वाल्या मल्टिप्लेक्स मंदी बी येत नाई ...अन घरी लावेल त्या छत्रीवर एवढे चॅनल आय गदिले गयाठा पण धड एक पिच्चर नाई पायत कोणी पुरा ... तुमिच सांगा ते मजा येते काय ?
वऱ्हाडी कट्टा (उणाया)
ओ गोल्या अरे मुंग्या आल्या न बे एन्टीना फिरो न लेका एण्टम्या ...📺😛

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा