भेंडवळची घटमांडणी :
वऱ्हाडातील सुमारे ३५० वर्षांपासूनची एक परंपरा म्हणजे 'भेंडवळची घटमांडणी.' बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणारी इथली घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते आणि लोकांचा या अंदाजांवर विश्वास आहे...
अशी असते '' मांडणी ''
अक्षय तृतीयेला सूर्यास्तापूर्वी गावाबाहेर नियुक्त करण्यात आलेल्या एका शेतात घटाची आखणी करतात. यात गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी, मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा आदी विविध जातींची धान्य मांडली जातात. घटाच्या मध्यभागी खोल खड्डा करून त्यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक असलेली चार मातीची ढेकळे त्यावर पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोळी, कुरडी, तर खाली विड्याच्या पानावर सुपारी ठेवून प्रतीकात्मक मांडणी केली जाते. दुसर्या दिवशी सूर्योदयापूर्वी या घटात झालेल्या बदलावरून भाकीत वर्तवल्या जात असल्याची परंपरा आहे...!
भेंडवळ च्या घटमांडणीची भाकिते
- कापूस चांगला येणार .
- ज्वारी पिक चांगले पण नासाडी
- तूर चांगली .
- मुंग सर्वसाधारण .
- उडीद
- तीळ साधारण .
- भादली रोग जास्त .
- बाजरी मध्यम
- हिवाळी मुंग मध्यम
- तांदूळ भरपूर
- हरभरा अनिश्चित .
- मसूर कमी .
- पहिला महिना बरा, दुसरा व तिसरा व चौथा महिना भरपूर पाऊस .
- अवकाळी पाऊस आहे .
- राजा कायम आहे .
- नैसर्गिक संकट भरपूर येतील , जलप्रलयात लोक वाहून जातील .
- चारा टंचाई आहे .
.........................................................

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा