#VidarbhaDarshan - कोळेश्वर मंदिर, रोहिणखेड
बुलढाणा जिल्ह्यांत मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे अस्तित्वात असलेले प्राचीन शिव मंदिर हे कोळेश्वर नावाने ओळखले जाते. मोताळा तालुक्यापासून १२ कि.मी. अंतरावरील रोहिणखेड हे प्रसिद्ध तथा पुरातन वस्ती असणारे गाव आहे.
कोळेश्वर मंदिर प्राचीन असून हेमाडपंथी शैली मध्ये मंदिराचे बांधकाम केलेले आहे. मंदिराच्या स्तंभावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्यात महादेवाची पिंड आहे, ही पिंड महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवलिंग म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात येथे भक्तांची गर्दी जमते.
रोहिणखेड गावात या कोळेश्वर मंदिरासह अनेक ठिकाणी पुरातन वास्तुंचा ठेवा आहे. येथे स्थापत्य कलेचा विलोभनीय उदाहरण असलेली मशीद आहे. एकेकाळी निजामशाहीत राजधानीचे शहर म्हणून रोहिणखेड गावाला रोहिणाबाद अशी ओळख होती. येथे दोन मोठय़ा लढाया झाल्याचा इतिहास आहे. सन १४३७ च्या सुमारास खान्देशचा सुलतान नजिरखानने त्याचा जावई अल्लाउद्दीन बहामनीवर स्वारी केली. सन १९५0 च्या सुमारास अहमदनगरच्या राजकुमार बुरहानने खान्देशचा राजा अलिखानच्या बरोबर जमालखानवर याच ठिकाणी युद्ध केल्याची नोंद आहे. निजामशाहीतील रोहिणाबाद हे राजधानीचे शहर व्यापारासाठी प्रसिद्ध असल्याने सुखी व समृद्ध होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा