#VidarbhaDarshan
वऱ्हाडी कट्टा सदरातील आजची बाहुबली वर आधारित पोस्ट-
पुरा तीन घंटे बाहुबली टक लावुन पायला.. हिरोचें केसं उडे तवां मांगची हिप्पी कीतीक हाय केसाची बोटं फिरवु फिरवु पाहो.. त्याची दाढी उळे हवेनं न मस्त भुरभुर त दाढीतुन हात फीरवुन मस्त हिरोसारखीच फिलींग इन्जॉय करो.. त्यांच्या एका एका डायलागं वर तोंड असं एकदम आवेशपुर्ण अन लयच नाक गीक अस फुगवुन राजेशाही दिसाची फिलींग मनात आनो.... टाकीजीतले बाकीचे मानसं त नीराच उली उली दिसत मायेपुढे जसे.. इतकी मायी नजर व्यापक झालती की परद्याच्यान तसे दिसत ते कायमाईत. पण इतके की मच्छर हायेत सायाचे सगळे आपलेपुढे. एक फुक मारली त उडुन जातील सगळे असा विचार करता अन पिच्चर पायता इंटरवल आला..
बाहेर जाचे वाक्ती काहीजनं मधातच पाय लंबे करुन बसेल. त्याईच्या कडे बम्म रागानं, त्वेषानं असी एक भुवई उच्ची करुन प्रभास सारख पाहो.. त्याले ते इतक्या कमी उजीडात दिसली की नाई दिसली कायमाहीत. पण त्यान पाय जमा केलते..
पीच्चर सुटल्यावर त असा हिरोसारखाच भाईर निंगालो. नाक गीक फुगवुन, छाती गीती काढुन टकाटक एकदम... भाईर निंगता बरोबर पाच रुपयाचे खरमुरे घेतले. त त्यान कागदाच्या पुंगईत चारपाचच दाने देले. त त्याचा तो कोपर अन त्याची ते गरम गवऱ्याची तवली अन त्यालेही अस उडवुन द्या वाटल.. खरमुरे खाऊन रायलतो चांगले त एक धडाधुंगळा भिकारी आला दोन रुपये मांगत त्याच्या नाकावर एक बुक्की मारा वाटली जोऱ्यानं.. गाडी काढुन घरी जातांनी जो ही मंधात आला गाडीवाला ओव्हरटँक कराले पाहुन त्याचे आंगावरच गाडी न्या वाटली.. काही लोकं पाहुन रायले त. म्हतल शंभर टक्के आपुन बाहुबलीसारखे दिसुन रायलो काहीतरी. दाडीगीडीच्यान...
घरी आलो. हातपाय धुतले. अन भांग कराले आरशाजोळ आलो. त काई नोत राजे हो.... भुरके भुरके केसं होते गयभान्यासारखे.. एखांद्या वैताग्या सारखी दाढी दिसे. डोये नीरा बारीक बारीक अन दोन्ही इकुन अर्धा अर्धा किलोचे दोन गाल.. हिरो समजलच सोताले त समजा नवाजुद्दिन सिद्धिकी.. बस याचे पुढे लुक काई गेला नाई अन अजुनच तोंड उतरल. पुरी तीन घंट्याची हवा भसकन्न गेली......
चिञपट हे समाजमनावर इफेक्ट करतात. अस आयकल होतं....!
पण इतका.......
- वऱ्हाडी कट्टा
लेखक - शिवा भाऊ देशमुख

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा