#VidarbhaDarshan - भंडारेश्वर मंदिर, गडचिरोली
भंडारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड गावाच्या पश्चिमेला असलेले एक प्राचीन मंदिर आहे. खोब्रागडी व वेनलोच्चा नद्यांच्या संगमाच्या उंचवट्यांवर हे मंदिर स्थित आहे. येथे भगवान शिवाचे शिवलिंग आहे, प्रवेशद्वारात नंदी आहे.
हे मंदिर दर्जेदार वास्तूचे एक उत्तम उदाहरण आहे आणि भिंती वर सुंदर आणि रेखीव कोरीव काम आहे त्यावरून हे मंदिर हेमाडपंथी काळखंडातील समजल्या जाते. महाशिवरात्रीला येथे दूरदूर हून लोक एकत्र होतात. मंदिरात नैसर्गिक प्रतिध्वनी प्रणाली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा