मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोळेश्वर मंदिर, रोहिणखेड

#VidarbhaDarshan - कोळेश्वर मंदिर, रोहिणखेड बुलढाणा जिल्ह्यांत मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे अस्तित्वात असलेले प्राचीन शिव मंदिर हे कोळेश्वर नावाने ओळखले जाते. मोताळा तालुक्यापासून १२ कि.मी. अंतरावरील रोहिणखेड हे प्रसिद्ध तथा पुरातन वस्ती असणारे गाव आहे. कोळेश्वर मंदिर प्राचीन असून हेमाडपंथी शैली मध्ये मंदिराचे बांधकाम केलेले आहे. मंदिराच्या स्तंभावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्यात महादेवाची पिंड आहे, ही पिंड महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवलिंग म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात येथे भक्तांची गर्दी जमते. रोहिणखेड गावात या कोळेश्वर मंदिरासह अनेक ठिकाणी पुरातन वास्तुंचा ठेवा आहे. येथे स्थापत्य कलेचा विलोभनीय उदाहरण असलेली मशीद आहे. एकेकाळी निजामशाहीत राजधानीचे शहर म्हणून रोहिणखेड गावाला रोहिणाबाद अशी ओळख होती. येथे दोन मोठय़ा लढाया झाल्याचा इतिहास आहे. सन १४३७ च्या सुमारास खान्देशचा सुलतान नजिरखानने त्याचा जावई अल्लाउद्दीन बहामनीवर स्वारी केली. सन १९५0 च्या सुमारास अहमदनगरच्या राजकुमार बुरहानने खान्देशचा राजा अलिखानच्या बरोबर जमालखानवर याच ठिकाणी युद्ध केल्या...

हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक गाव जयपूर

#VidarbhaDarshan - हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक गाव जयपूर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जयपूर गाव हे गाव हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. या गावात मंदिर आणि मशीद एकाच ठिकाणी आहेत, अगदी भिंतीला भिंत लागून आहेत, तरीही आजवर इथे कधी सामाजिक दंगल किंवा धार्मिक तनाव निर्माण झाला नाही. सर्व हिंदू आणि मुस्लिम मिळून मिसळून राहतात. मोताळा तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या जयपूर गावात हनुमान मंदिर आणि मशीद एकाच ठिकाणी आहेत. एकीकडे मशीदीत अजान - नमाज अदा केली जाते तर दूसरीकडे मंदिरात घंटांच्या नादात बजरंग बलीचा जयघोष चालू असतो. भक्तीचा मार्ग जरी वेगवेगळा असला तरी सर्वांची श्रद्धा एक आहे. मंदिर आणि मशीद जवळ एक वटा बांधलेला आहे, जिथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक एकत्र बसून विचारांची देवाणघेवाण करतात. हिंदू आणि मुस्लिम एकमेकांच्या लग्न कार्यात सहभागी होतात. दसरा - दिवाळीला मुस्लिम लोक हिंदूना आलिंगन देऊन शुभेच्छा देतात, हिंदू लोक त्यांना फराळाला घरी नेतात. याचप्रमाणे ईद साजरी केली जाते. हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना ईद मुबारक देतात, मुस्लिम बांधव ही हिंदू...

भंडारेश्वर मंदिर, गडचिरोली

#VidarbhaDarshan - भंडारेश्वर मंदिर, गडचिरोली भंडारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड गावाच्या पश्चिमेला असलेले एक प्राचीन मंदिर आहे. खोब्रागडी व वेनलोच्चा नद्यांच्या संगमाच्या उंचवट्यांवर हे मंदिर स्थित आहे. येथे भगवान शिवाचे शिवलिंग आहे, प्रवेशद्वारात नंदी आहे. हे मंदिर दर्जेदार वास्तूचे एक उत्तम उदाहरण आहे आणि भिंती वर सुंदर आणि रेखीव कोरीव काम आहे त्यावरून हे मंदिर हेमाडपंथी काळखंडातील समजल्या जाते. महाशिवरात्रीला येथे दूरदूर हून लोक एकत्र होतात. मंदिरात नैसर्गिक प्रतिध्वनी प्रणाली आहे.

गोरजाई माता मंदिर, गडचिरोली

#VidarbhaDarshan - गोरजाई माता मंदिर, गडचिरोली गोरजाई मंदिर हे गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड येथे आहे. देवी गोराजियाच्या दर्शनासाठी खूप भाविक येथे येत असतात. हे मंदिर वैरागड किल्ल्याच्या दक्षिणेला आणि खोब्रागडी व वेनलोच्चा नद्यांच्या संगमाजवळील आहे. मंदिराची वास्तुशिल्पाची स्थिती विलक्षण स्थितीत आहे आणि त्याची छत अठरा खांबांवर आहे. वैरागड येथे असलेल्या दोन हेमाडपंथी मंदिरापैकी हे एक आहे, पण या मंदिराची सध्या दुरावस्था झालेली आहे.

कमळेश्वर मंदिर, लोहारा

#VidarbhaDarshan - कमळेश्वर मंदिर, लोहारा यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा येथील छोट्याशा गावात पुरातन महादेव मंदिर अस्तित्वात आहे, हे मंदिर जवळपास 1100 वर्षे जुने आहे. अमरावती रोडवर यवतमाळ पासून अवघ्या 5कि.मी. अंतरावर लोहारा हे गांव आहे. अमरावतीला जातांना अगदी रस्त्यावरून येथील महादेवाचे हेमांडपंथी मंदिर दिसते. हे मंदिर यादवकालीन असून यादवांचे प्रधान हेमाद्री यांनी त्याची बांधणी केल्याचे मंदिराच्या धाटणीवरून लक्षात येते. हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा उकृष्ट नमुना असल्याचे दिसून येते. ह्या मंदिराचा परिसर अत्यंत प्रसन्न व शांत आहे. अशा या मंदिरातील महादेवाची उंच पिंड बघायला मिळते. महादेवाच्या पिंडीसमोरील श्री गणेशाचे विलोभनीय रूप आपणास पाहावयास मिळते. महाशिवरात्रीला येथे भक्तांची गर्दी जमते. हे प्राचीन मंदिर निसर्गरम्य परिसरात असल्यामुळे  भक्तांना एक अद्भुत शांती चा अनुभव देते.

नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती

#VidarbhaDarshan - नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती शिव! अर्थात शंकर. लोप किंवा नाशाचे प्रतिक. आणि म्हणूनच नाविन्याला, सृजनाला प्रेरणा देणारे. शिवलिंगाची आराधना आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे अगदी पाच पंचवीस उंबर्‍याच्या गावांमध्येही शिवालय असतेच. या मंदिराची नावही भक्तांनी प्रेमाने ठेवलेली. कुठे हा सोमेश्वर, कुठे कोंडेश्वर, कुठे आदिनाथ. अशी कितीतरी नावांनी भक्त त्याची आराधना करतात. असेच एक पुरातन सुरेख मंदिर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भातून आणि मध्यप्रदेशातून खूप भक्त इथे दर्शनाला येतात. गावाचे नावच शंकरावरून दिले आहे, नांदगाव खंडेश्वर. नांदगाव खंडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण. अमरावतीपासून अवघे ३६ किमी अंतरावर ४५० उंबर्‍याच्या गावात मध्यवस्तीत शंकराचे एक मंदिर आहे. त्याला म्हणतात खंडेश्वर. खंडेश्वर गावात मध्यवस्तीत आल्यावर एक उंच टेकाड आहे. वर जाण्यासाठी पूर्वी येथे दगडी पायर्‍या होत्या. आता तिथे सिमेंटच्या पायर्‍या बांधल्या आहेत. या २५-३० पायर्‍या वर चढून गेलं की एक काळ्या दगडांचा भव्य परकोट लागतो. या परकोटामधून आत शिरले की प्रशस्त प्रांगणाच्य...

कोंडेश्वर मंदिर, अमरावती

#VidarbhaDarshan - कोंडेश्वर मंदिर, अमरावती कोंडेश्वर मंदिर हे भगवान शिवाला अर्पण केले आहे. हे मंदीर प्राचीन हत्‍ती मंदीराच्‍या बाजुला जंगला मधोमध आहे. हया मंदीराचे बांधकाम वास्‍तुशास्‍त्रीय हेमाडपंथीय पध्‍दतीने आणी काळया दगडांनी बांधले. महाशिवरात्री हा महत्‍वाचा सण या मंदीरात साजरा केला जातो. श्री. खटेश्‍वर महाराज समाधी, तलाव, पाण्‍याचा धबधबा मंदीराच्‍या सभोवताल आहे.

उमरेड - कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य, नागपूर

#VidarbhaDarshan - उमरेड, कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य, नागपूर निसर्गाप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे नवीन अभयारण्य खुले करण्यात आले आहे. ह्याच जंगलात आशिया खंडातील सर्वात मोठा "जय टायगर" होता जो अचानक एप्रिल 2016 पासून बेपत्ता झाला आहे ! पवनी तालुक्यात पर्यटनक्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. विदर्भातील सर्वात मोठे गोसीखुर्द धरण, पवनीचा ऐतिहासीक किल्ला, रुयाळ येथील आंरराष्ट्रीय स्थळाचे महासमाधी, महास्तूप, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी श्रीगणेश मंदीर, धरणीधर गणेश मंदीर आदी पर्यटन स्थळांचा समावेश आहे. अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. पर्यटनात वाढ गोसेबुज : उमरेड-कर्‍हांडला अभयारण्यांतर्गत येणार्‍या पवनी वन्यजीव अभयारण्यात करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेत ४४४ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. या गणनेत ४0 वनकर्मचारी व पाच अशासकीय सदस्यांचा समावेश होता. या अभयारण्याची शान ठरलेल्या जय नामक वाघाची व वाघीनीची नोंद उमरेडजवळ करण्यात आली. तालुक्यात झपाट्याने वाढत असलेल्या पर्यटन क्षेत्रामुळे या अभयारण्यातही मोठय़ा संख्य...

भेंडवळची घटमांडणी - 2017

भेंडवळची घटमांडणी : वऱ्हाडातील सुमारे ३५० वर्षांपासूनची एक परंपरा म्हणजे 'भेंडवळची घटमांडणी.' बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणारी इथली घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते आणि लोकांचा या अंदाजांवर विश्वास आहे... अशी असते '' मांडणी '' अक्षय तृतीयेला सूर्यास्तापूर्वी गावाबाहेर नियुक्त करण्यात आलेल्या एका शेतात घटाची आखणी करतात. यात गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी, मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा आदी विविध जातींची धान्य मांडली जातात. घटाच्या मध्यभागी खोल खड्डा करून त्यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक असलेली चार मातीची ढेकळे त्यावर पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोळी, कुरडी, तर खाली विड्याच्या पानावर सुपारी ठेवून प्रतीकात्मक मांडणी केली जाते. दुसर्‍या दिवशी सूर्योदयापूर्वी या घटात झालेल्या बदलावरून भाकीत वर्तवल्या जात असल्याची परंपरा आहे...! भेंडवळ च्या घटमांडणीची भाकिते - कापूस चांगला...

बाहुबली | वऱ्हाडी कट्टा

#VidarbhaDarshan वऱ्हाडी कट्टा सदरातील आजची बाहुबली वर आधारित पोस्ट- पुरा तीन घंटे बाहुबली टक लावुन पायला.. हिरोचें केसं उडे तवां मांगची हिप्पी कीतीक हाय केसाची बोटं फिरवु फिरवु पाहो.. त्याची दाढी उळे हवेनं न मस्त भुरभुर त दाढीतुन हात फीरवुन मस्त हिरोसारखीच फिलींग इन्जॉय करो.. त्यांच्या एका एका डायलागं वर तोंड असं एकदम आवेशपुर्ण अन लयच नाक गीक अस फुगवुन राजेशाही दिसाची फिलींग मनात आनो.... टाकीजीतले बाकीचे मानसं त नीराच उली उली दिसत मायेपुढे जसे.. इतकी मायी नजर व्यापक झालती की परद्याच्यान तसे दिसत ते कायमाईत. पण इतके की मच्छर हायेत सायाचे सगळे आपलेपुढे. एक फुक मारली त उडुन जातील सगळे असा विचार करता अन पिच्चर पायता इंटरवल आला.. बाहेर जाचे वाक्ती काहीजनं मधातच पाय लंबे करुन बसेल. त्याईच्या कडे बम्म रागानं, त्वेषानं असी एक भुवई उच्ची करुन प्रभास सारख पाहो.. त्याले ते इतक्या कमी उजीडात दिसली की नाई दिसली कायमाहीत. पण त्यान पाय जमा केलते.. पीच्चर सुटल्यावर त असा हिरोसारखाच भाईर निंगालो. नाक गीक फुगवुन, छाती गीती काढुन टकाटक एकदम... भाईर निंगता बरोबर पाच रुपयाचे खरमुरे घेतले. त त्...

भवानी माता मंदिर, बार्शी टाकळी

#VidarbhaDarshan - भवानी माता मंदिर, बार्शी टाकळी, अकोला विदर्भातील बार्शी टाकळी, जिल्हा अकोला येथील भवानी मंदिर, एक उत्तम पर्यटन आकर्षण बनले आहे. पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेने (एएसआय) त्याचे जतन कार्य हाती घेतल्याबद्दल धन्यवाद, मध्ययुगीन काळापासून सुरू होणारे हे मंदिर, त्याची भव्यता आणि सौंदर्य कायम ठेवत आहे. आर्ट आणि आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईनची भव्यता आता संशोधनाचा विषय आहे. देवी भवानीला समर्पित हे मंदिर काळ्या बेसाल्टपासून बनले आहे. अकोल्याच्या दक्षिणेस बार्शी टाकळीच्या सीमा भागात नागपूरहून सुमारे 265 किलोमीटरचे अंतर आहे. मंदिरामध्ये एक गाभारा, एक अंतराळा आणि मंडप आहे. एक उच्च व्यासपीठ वर बांधले. मंडपची योजना आयताकृती आहे, तर तीर्थक्षेत्र तारकासमोरील आहे. सभामंडप लहान प्रवेशद्वारातून प्रवेश करून चार सुशोभित खांबांवर आधारलेला आहे. सभामंडपाच्या दरवाजाच्या भिंतीवर खूप छान कोरीव काम दिसते. सभागृहाची शिस्तबद्ध छप्परही कोरलेली आहे. हे मानव आणि पशु शिल्पासारख्या डिझाईन्स तसेच त्रिकोणी डिझाईन्स, कमळच्या पाकळी वाळू लोजेंजसह सुशोभित केले आहे. खांबही सुशोभित केलेले आहे...

आनंदेश्वर मंदिर, लासूर

#VidarbhaDarshan - आनंदेश्वर मंदिर, लासूर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले लासूरचे आनंदेश्वेर मंदिर अमरावती जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव आहे. दर्यापूर तालुका मुख्यालयापासून अकोला मार्गावर १२ कि.मी. अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर लासूर नावाचे एक छोटेसे गाव आहे. गावाच्या दक्षिण दिशेला हेमाडपंथी प्राचीनकलेचा अप्रितम नमुना असलेले शिवमंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जागृत शिवलिंगाची स्थापना केली आहे. १२ व्या शतकात बांधलेले हे शिवमंदिर आनंदेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते. सद्यस्थितीत जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या तीन शाबूत हेमाडपंथी मंदिरांपैकी अग्रगण्य असलेले हे मंदिर ३५०० चौ. फुटांच्या अतिभव्य दगडी बांधकामात आहे. वरुन स्वस्तिक आकार असणाऱ्या या मंदिराला कळस नाही. हे मंदिर अष्टकोनी असून समोरच्या भागाकडून एखाद्या भल्यामोठ्या रथाला हत्ती जुंपल्यासारखे दिसते. या मंदिराचा दर्शनी भाग उत्तरेकडे असून दारे व खिडक्या पुर्व-पश्चिम व उत्तर दिशेला आहेत. संपुर्ण मंदिराचे बांधकाम एकावर एक दगडी शिळा रचून नंतर त्यावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या आतील भागात १२ खुले व भिंतीमधील ६ असे एकूण १८ खांब आह...